ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पुस्तक दिन

सोनई – “जागतिक पुस्तक दिनानिमित्त” सौ. सुनीताताई शंकरराव गडाख (माजी सभापती ,नेवासा पंचायत समिती) यांनी बुध दि 23 एप्रिल 2024 रोजी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव येथे भेट दिली. उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला
या प्रसंगी विद्यार्थ्यांशी बोलतांना मा सौ सभापती सुनीताताई गडाख म्हणाल्या. प्रसिद्ध जागतिक कवी लेखक तसेच नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस जगभरात जागतिक पुस्तक दिन म्हणून उत्साहाने साजरा करण्यात येतो यानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विशेष आनंद वाटतो. विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचनाकडे लक्ष द्यावे व्यक्तिमत्त्व विकास घडवावा असे म्हणाल्या व विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आवर्जून वाचनालय सुरू करण्यात आले आहे याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असेही त्या म्हणाल्या.

पुस्तक दिन

तसेच विद्यार्थ्यांनी काळाच्या ओघात स्वतःमध्ये बदल करावा व मोबाईलचा वापर आवश्यक गोष्टीसाठीच करण्याचा सल्ला दिला. तसेच अवांतर वाचन, वर्तमानपत्राचे वाचन, मासिके कादंबऱ्या वाचण्याचा व त्यासाठी वेळ काढण्याचा मोलाचा सल्ला दिला. आपण सर्व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी असूनही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले. विद्यार्थ्यांनी आपला कल ओळखून पुढील दिशा निश्चित करावी व यशस्वी होऊन आपले योगदान समाजासाठी द्यावे अशी भावना व्यक्त केली. तसेच आपल्या अंगी असलेल्या क्षमतेला वाव मिळण्यासाठी निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना सांगितले. व विद्यार्थ्यांशी व्यक्तिशः संवाद साधला.

पुस्तक दिन

या प्रसंगी सुनीताताई गडाख यांनी नुकतेच नव्याने बनविण्यात आलेले विद्यालयाचे आकर्षक प्रवेशद्वार, विद्यालयाचे माजी विद्यार्थी जे सध्या उच्च पदावर कार्यरत आहे व आपल्या कार्यकर्तृत्वाने संस्थेचा शाळेचा गावाचा व परिसराचा नावलौकिक वाढवीत आहे, अशा विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी फ्लेक्स बोर्ड, तसेच खुले वाचनालय, विद्यार्थ्यांनी कष्टाने फुलविलेली परसबाग, विद्यालयातील विविध प्रकारचे झाडे वनस्पती वेली अशी निसर्ग संपदा, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारा पोषण आहार, विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा यासाठी संस्थेने उभारलेली अटल लॅब, ग्रंथालय, प्रयोगशाळा , प्रशस्त मैदान, शैक्षणिक सहल, कंपोस्ट खत प्रकल्प तसेच विद्यालयाकडून वर्षभरात राबविण्यात येणारे उपक्रम याचे कौतुक केले.

पुस्तक दिन

विद्यालयाच्या परिसरामध्ये त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक लहानू ढाले सर, सुभाष जाधव , दीपक गडाख , संजय जाधव , दशरथ लांघे सर, प्रसाद कानडे , पांडुरंग बेल्हेकर , ज्ञानदेव तुवर, दादासाहेब होन, सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव, यशवंत स्टडी क्लब चे ग्रंथपाल/सहसमन्वयक दादासाहेब तुवर व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाधव व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक लहानु ढाले सर यांनी केले


स्व भास्करराव बाजीराव जाधव यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जाधव कुटुंब यांनी दिलेली रोपे त्याचे मा सुनीताताई गडाख यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले

पुस्तक दिन
पुस्तक दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुस्तक दिन
पुस्तक दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुस्तक दिन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!