ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
आरोपी

नेवासा-दिनांक २६.०४.२०२५ रोजी १३.०० वाजता परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ खाडे यांचे पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोकों/सुमित करंजकर, पोकों/नारायण डमाळे असे नेवासा फाटा ते नेवासा खुर्द शहर जाणारे हायवेवर मोटार सायकलवर पेट्रोलिंग करत असताना बालाजी सेल्स कार्पोरेशनच्या भारत पेट्रोलपंपावर मुंबई पोलीस कायदा कलम ५६(१) (अ) (ब) प्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातीचे सिमेतुन ०२ वर्षांकरीता हद्दपार केलेला ईसम नामे आकाश ऊर्फ देवा जालींदर लष्करे रा. संभाजीनगर ता. नेवासा जि. अहिल्यानगर हा दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन नेवासा येथे आणण्यात आले

आरोपी

तद्नंतर सदर ईसम नामे आकाश ऊर्फ देवा जालींदर लष्करे रा. संभाजीनगर ता. नेवासा जि. अहिल्यानगर बालाजी सेल्स कार्पोरेशनच्या भारत पेट्रोलपंप नेवासा खुर्द ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथे मिळुन आल्याने त्याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

तरी यापुढे असे हद्दपार केलेले आरोपीतांनी सावध होवुन जावे नाहीतर त्यांचेविरुध्द अशा प्रकारचे गुन्हे दाखल करुन त्यांचेविरुध्द कठोरात कठोर अथवा हद्दपार किंवा MPDA कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

आरोपी

सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्रीम. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर व उप विभागीय पो. अधिकारी श्री. सुनिल पाटील शेवगाव उपविभाग यांचे सुचना मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक संतोष आ. खाडे यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोहेकॉ अजय साठे, पोकों/सुमित करंजकर, पोकों/नारायण डमाळे, पोकॉ/श्रीनाथ गवळी, पोकों/अरविंद वैद्य यांनी केलेली आहे.

आरोपी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *