नेवासा शहरातील रहिवासी असलेला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा येथे शिक्षण घेत असणाऱ्या श्रावण पडोळ या विद्यार्थ्यांने सन 2024-2025. मध्ये अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या व त्या मध्ये अलौकिक असे यश संपादन केले या मध्ये 1.लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये राज्यात दुसरा आला असून त्याला ३००पैकी२८८ गुण मिळाले आहे.तसेच आय एम विनर परीक्षा यामध्ये राज्यात तिसरा आला असून त्याला ३००पैकी २५२ गुण मिळाले आहे.

तसेच मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये राज्यात बारावा क्रमांक असून, जिल्ह्यात सातवा आला आहे व,केंद्र गुणवत्ता यादी मध्ये दुसरा आला असून त्याला ३००पैकी २७६ गुण मिळाले आहे.
तसेच एन एस इ परीक्षा राज्य गुणवत्ता क्रमांक यादीत तो अकरावा आला असून त्याला २००पैकी १७४ गुण मिळाले आहे.तसेच हिंदसेवा मंडळ टॅलेंट सर्च परीक्षा केंद्रात दुसरा आला असून त्याला ३००पैकी २४४ गुण मिळाले आहे.तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी यामध्ये ३०० पैकी २४८ मार्क्स मिळवले आहेत.व जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा यामध्ये 95 टक्के मार्क्स मिळाले आहेत परंतु शहरी भागामधून असल्यामुळे नवोदय विद्यालय मध्ये नंबर लागलेला नाही.

श्रावणला या स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल विविध प्रमाणपत्र, ट्रॉफी व स्कॉलरशिप रक्कम मिळाली आहे.
तरी श्रावणच्या या यशाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे. अतिशय कष्ट घेऊन त्याने हे यश संपादन केले आहे.श्रावणला अभ्यासाबरोबर क्रिकेटची फार आवड आहे.त्याच्या या कामगिरी मध्ये वर्गशिक्षक श्री.रवींद्र पागिरे सर व मुख्याध्यापक श्री. पोपट घुले सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. श्रावण हा प्रा.आबासाहेब पडोळ व सौ.अलिशा पडोळ यांचा मुलगा आहे.त्याच्यावर समाजातील विविध स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.