ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
परशुराम जयंती

नेवासा – श्री परशुराम प्रतिष्ठान, नेवासा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री परशुराम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

मंगळवार, दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी श्री मोहिनीराज मंगल कार्यालय, नेवासा येथे सकाळी 10 वाजता दीपप्रज्वलन व भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

परशुराम जयंती

या वेळी रामभाऊ मुळे, प्रमोद देशपांडे, सचिन देशपांडे, सौ. बल्लाळ मॅडम, संजीवनी देशपांडे, बाळासाहेब पाटील, ओस्थवाल काका, जयंत देवचक्के, लालूकाका जोशी, बल्लाळ साहेब आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

मूर्ती पूजनानंतर ह. भ. प. सौ. मृणालिनीताई मुळे यांचे समाज प्रबोधनपर प्रवचन संपन्न झाले.

परशुराम जयंती

त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, नेवासा येथील मठाधिपती ह. भ. प. देविदास महाराज म्हस्के, नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संतोष खाडे साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान परशुरामांची महाआरती करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री परशुराम प्रतिष्ठानचे सचिन देशपांडे, संजय देशपांडे, गुरुप्रसाद देशपांडे व निलेश जोशी यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.

परशुराम जयंती
परशुराम जयंती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

परशुराम जयंती
परशुराम जयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

परशुराम जयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *