नेवासा-पोलीस ठाणे नेवासा 1 मे महाराष्ट्र दिन निमित्त ड्राय डे कोरडा दिवस असताना मा. परि. पोलीस उपअधिक्षक सो यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, महाराष्ट्र दिन अनुषंगाने शासनाने कोरडा दिवस ड्रायडे जाहीर केलेला आहे

तरी पण पोस्टे नेवासा हददीमध्ये छञपती संभाजी नगर ते अहिल्यानगर हायवे वरील तसेच लगतच्या रोडवरील परमिट रुम नामे सनि पॅलेस, अर्चना, विजय, दिपक, मातोश्री, पंचशील, मयुर व वैभव असे परमिट रुम मध्ये चोरुन मद्यविक्री करत आहे अशी खाञीशीर माहीती मिळाली असता लागलीच निरीक्षक राज्य उत्पादण शुल्क नेवासा विभाग जि. अहिल्यानगर यांचेशी संम्पर्क करुन त्यांचेकडील दुय्यम निरीक्ष्क प्रशांत पाटील, सहा. दुय्यम निरीक्षक ए.के. शेख व महिला कॉस्टैबल व्ही.एस.जाधव यांना सोबत घेुवन तसेच पाहणी केली असता हॉटेल वैभव परमिट रुम व बिअर बार जळके खु व हॉटेल मयुर परमिट रुम व बिअरबार माळीचिंचोरा शिवार हे कोरडा दिवस जाहीर केलेला असतांना चोरुन मद्यविक्री करतांना आढळुन आले तसेच उर्वरीत परमिट रुम ची पाहणी केली असता ते बंद मिळुन आल्याने

हॉटेल वैभव परमिट रुम व बिअर बार जळके खु ता नेवासा जि. अहिल्यानगर याचे मालक नानासाहेब रघुनाथ चिमणे वय. 48 वर्ष धंदा हॉटेल चालक रा. जळके खु ता. नेवासा व हॉटेल मयुर परमिट रुम व बिअरबार माळीचिंचोरा शिवार चे मालक अमोल बाळासाहेब चिंधे वय. 32 धंदा हॉटैल चालक रा. माळीचिंचोरा ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करणेकामी निरीक्षक राज्य उत्पादण शुल्क नेवासा विभाग जि. अहिल्यानगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर बाबत पुढील कार्यवाही निरीक्षक राज्य उत्पादण शुल्क नेवासा विभाग जि. अहिल्यानगर हे करीत आहे .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.