शर्यतीत १०५ घोडा-बैल जोड्यांचा सहभाग
पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे सुरू असलेल्या ग्रामदैवत चैतन्य श्री गहिनीनाथ महाराज यात्रेची सांगता घोडा बैलांच्या थरारक शर्यतीने झाली. शेंबीगोंडा शर्यतीत पंचक्रोशीतील १०५ घोडा-बैल जोड्यांनी सहभाग नोंदवला. राहुरी तालुक्यातील तिळापूर गावातील घोडा-बैल जोडीने पहिले बक्षीस घेत या शर्यतीचे मानकरी ठरले.
अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या शुक्रवारी यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो. यात चैतन्य श्री गहिनीनाथ महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.दि २ मे २०२५ शुक्रवारच्या मुख्य यात्रोत्सवाच्या दिवशी छबीना मिरवणूक झाली. रात्री १२ वाजता शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. शनिवारी ३ मे रोजी सायंकाळी १० वाजता स्नेहा पिंपरीकर बहारदार लावण्याचा ऑर्केस्ट्रा नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित केलेला होता.

रविवार ४ मे दुपारी ४ ते साडेसात वाजेपर्यंत घोडा बैल शर्यत शेंबीगोंडा कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला रोख स्वरूपात अकरा हजार रुपये बक्षीस देण्यात आले तर दुसरा क्रमांकाला सात हजार पाचशे रुपये तर तिसरा क्रमांकांसाठी रोख रुपये पाच हजा पाचशे रुपये देण्यात आले. यात्रेत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय भोंभे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक कुदळे,किरण पवार,हरिभाऊ धायतडक यांनी यात्रेच्या व शेंबीगोंडा दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला. यात्रा कमिटीच्या वतीने सर्व देणगीदाराचे आभार व्यक्त करून ग्रामदैवत चैतन्य श्री गहिनीनाथ महाराजांच्या नावाने घोषणा देत यात्रेची गोड सांगता झाली.
सलग तिसऱ्या वर्षी देखील राहुरी तालुक्यानेच पटकविले बक्षीस,तीन वर्षांपासून पहिल्या बक्षीसाचे मानकरी ठरला राहुरी तालुका.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.