नेवासा – आज दिनांक. 05/05/2025 रोजी श्री संतोष खाडे,मा. पोलीस उप अधीक्षक सो, पोलीस ठाणे नेवासा यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक इसम होंडा एक्टिवा स्कुटी मधून अवैध दारू विक्री वाहतूक करणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने लागलीच श्री संतोष खाडे,मा.पोलीस उप अधीक्षक सो यांनी पोलीस स्टॉप व पंच यांना सदर बातमीचा थोडक्यात हकीकत सांगून खाजगी वाहनाने रवाना केले.

20/30 वाचे सुमारास नगरपंचायत चौक येथे पोलीस स्टाफ यांनी सापला रचून सदर संशयित इसम गणपती चौकातून नगरपंचायत चौकाकडे येताना दिसला त्यास हात दाखवून थांबवले असता त्याने गाडी थांबवली त्यास आम्हा पोलीस स्टाफ व पंचाची ओळख करून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचं नाव श्री अक्षय मोहन पंदुरे राहणार नेवासा खुर्द तालुका नेवासा असे सांगितले त्यास त्याचे ताब्यातील होंडा स्कुटी मोटरसायकल झडतीचा उद्देश सांगून पंचा समक्ष स्कुटी मधील डिक्कीची झडती घेतली असता त्यामध्ये अवैध विदेशी दारूचा साठा मिळून आला.

पंचा समक्ष सदर विदेशी दारू व होंडा एक्टिवा स्कुटी मोटरसायकल असा एकूण.51,690/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल भारत बोडके यांचे फिर्यादीवरून आरोपी नामे अक्षय मोहन पंदुरे वय 30 वर्ष राहणार नेवासा खुर्द याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यान्वये पोलीस ठाणे नेवासा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब,मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्गे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव श्री सुनील पाटील साहेब, पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी मा.पोलीस उप अधीक्षक श्री संतोष खाडे,श्री अमोल पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस हवालदार श्री अजय साठे, पो.कॉ भारत बोडके, अवि वैद्य, सुमित करंजकर, गणेश जाधव यांचे पथकाने केली आहे…

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.