
India Pakistan Tensions Operation Sindoor: भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे.
Operation Sindoor: भारताने दहशतवादाविरुद्ध (India Air Strike On Pakistan) मोठी कारवाई केली आहे. आज (6 मे) मध्यरात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने पाकिस्तानवर थेट एअर स्ट्राइक केला. त्याला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नाव देण्यात आलं आहे. हे तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन होतं. पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते. 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. 9 च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत.

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. भारताने केलेल्या हल्ल्यावेळी बहावलपूरमध्ये 200 हून अधिक दहशतवादी होते, अशी माहिती मिळत आहे. तर मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी, मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी, कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी, सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी, गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी, भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी, चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी होते, अशी माहिती सांगितली जात आहे.

भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर
3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर

4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी
5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर
6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.

7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर
8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर
9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर

संरक्षण मंत्रालयानं काय म्हटलं?
ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की आमची कारवाई केंद्रीत,स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्धवस्त करण्यात खूप संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय 25 आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईल. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ, असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.