ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
सुदाम ठुबे

भारतीय ग्राहक महासंघ आणि भारतीय मानक ब्युरोतर्फे प्रशस्तीपत्र देऊन दिल्लीत गौरव!

नेवासा – राष्ट्रीय फेडरेशन भारतीय ग्राहक महासंघ (CCI)यांचे वतीने भारतीय मानक ब्युरो (BIS) यांचे राजधानी दिल्ली मानक भवन मधे दोन दिवसीय ट्रेनिंगचे आयोजन झाले .कुठल्याही वस्तू ,पदार्थ आणि इलेक्ट्रिकल उपकरणापासून ,सोन्याचे दागिन्यावरील हॉलमार्क अशा सर्व इतर वस्तूंसाठी एक विशिष्ट, भारतीय मानक ब्यूरो (BIS)यांचेकडून कोड दिला जातो व (BIS)मार्क असतो असे असताना देखील ग्राहकाची फसवणूक होते.ती फसवणूक होऊ नये म्हणून राष्ट्रीय फेडरेशन भारतीय ग्राहक महासंघ (CCI) हे राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर काम करून ग्रामपंचायत स्तरापासून ते शहरा पर्यंत ग्राहकांमध्ये जन जागृती करते.

सुदाम ठुबे

तसेच टोलफ्री नंबर 1915 हेल्पलाईन वर मदत घेता येते.अशा भारतीय ग्राहक महासंघाच्या राष्ट्रीय अधक्ष श्रीमती प्रीती पांड्या मॅडम आणि राष्ट्रीय चेअरमन अनंत शर्मा यांनी महाराष्ट्राचे भारतीय ग्राहक महासंघाचे अध्यक्ष रमेश गायकवाड (मुंबई)यांचे शिफारशी वरून ( CCI) भारतीय ग्राहक महासंघ या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पद नेवासा तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष आणि “साईनिर्मल” फाउंडेशनचे अध्यक्ष चळवळीचे माध्यमातून परिचित असणारे प्रसिद्ध दिवाणी कायदेतज्ञ अँड.सुदाम ठुबे यांना देण्यात आले.तसेच नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील प्रसिद्ध शेतकरी कर्णासाहेब तुवर यांना देखील भारतीय ग्राहक महासंघ (CCI) नेवासा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

सुदाम ठुबे

अध्यक्ष रमेश गायकवाड यांचे सूचनेनुसार व शिफारशी नुसार राज्यसचिव शहाजी तनपुरे मुंबई शहर अध्यक्ष संजय सकपाळ असे पाच पदाधिकारी भारतीय मानक ब्युरो तर्फे महाराष्ट्रातून राष्ट्रीय ट्रेनिंग साठी निवड करून तारीख ५ आणि ६ मे रोजी ट्रेनिंग मधे सहभाग नोंदवला . त्यांना प्रशिस्ती पत्रक आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रात भारतीय ग्राहक महासंघाचे उपाध्यक्ष अँड सुदाम ठुबे यांची नेमणूक करून “जागो राहक जागो “ ही चळवळ उभारण्यासाठी धुरा दिली. त्याबाबत गोमळवाडी ग्रामस्थांचे वतीने तसेच नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. गणेश निकम, अँड. अजय रिंधे, अँड. नितीन अडसुरे, अँड. भारतभूषण मौर्य ,अँड. बी. एस .शिरसाठ, अँड. भैयासाहेब देशमुख, अँड, मोशिन पठाण,अँड. खलिल पठाण तसेच आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष अँड. कदिर शिलेदार पोलीस पाटील आदेश साठे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कामास शुभेच्या दिल्या.

सुदाम ठुबे
सुदाम ठुबे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सुदाम ठुबे
सुदाम ठुबे
सुदाम ठुबे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सुदाम ठुबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *