ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
सौदामिनी प्रतिष्ठान

नेवासा –आज नेवासा फाटा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान आयोजित व परमपूज्य महंत गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालू झालेले संस्कार संस्कृती व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन समारंभआज दिनांक 10 में रोजी सकाळी 9:30 वा शुभहस्ते ह.भ.प महंत देवीदास महाराज म्हस्के श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा, व वंदना दीदी प्रजापिता ब्रम्हकुमारी सेंटर नेवासा यांच्या शुभहस्ते तथा मा.साहेबराव घाडगे पाटील संस्थापक त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान एवं सौ.सुमतीताई घाडगेपाटील अध्यक्षा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान नेवासा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी हभप महंत देविदास महाराज म्हस्के यांनी महिलांच्या नारी शक्तीचा महिमा सांगितला

सौदामिनी प्रतिष्ठान

पुरातन काळापासून शस्त्र आणि शास्त्रामध्ये नारी शक्तीचा मोठी उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख प्रामुख्याने याप्रसंगी केला. आणि ब्रह्मकुमारी च्या वंदना दिदी यांनी संस्कार संस्कृती आणि स्वसंरक्षण यासाठी ध्यान साधनचे महत्त्व पटवून दिले व शारीरिक व आत्मिक उन्नतीसाठी धैर्य आणि संयम किती महत्त्वाचा आहे हे देखील मुलींना संबोधित करताना सांगितले. याप्रसंगी वर्ग अधिकारी चारुताताई कडुरकर, वर्गपालक जयप्रकाश खोत, अमृता ताई नळकांडे, कृपाताई श्रोत्रिय , श्रीकांत नळकांडे, प्रशांत बहिरट, श्रीकांत काळे,आदिनाथ पटारे गणेश जामदार याप्रसंगी उपस्थित होते .

सौदामिनी प्रतिष्ठान

कार्यक्रम प्रसंगी सौदामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ अमृताताई नळकांडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की शिबिराचे सत्र पुढील दहा दिवस विविध उपक्रम अंतर्गत राबवून सुरू असणार आहे त्यामध्ये त्यामध्ये कराटे, लाठी काठी, यष्टी खेळ, तलवारबाजी, भालाफेक, रायफलबाजी, योगासन, ध्यानधारणा व विविध बौद्धिक सत्र, अंतराळ विज्ञान ,जंगल सफारी ,सामान्य ज्ञान, चरित्र अभ्यास, मनोरंजन, रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा, व विविध मान्यवरांचे मार्गदर्शन याप्रसंगी लाभणार आहे अशा विविध कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील 13 ते 25 वयोगटातील मुलींनी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा वेळ व्यर्थ न घालता या संस्कार शिबिराचा लाभ घेऊन सत्कारणी लावावा असे आवाहन सौदामिनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले

सौदामिनी प्रतिष्ठान
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सौदामिनी प्रतिष्ठान
सौदामिनी प्रतिष्ठान
सौदामिनी प्रतिष्ठान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सौदामिनी प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *