नेवासा बसस्थानकातील घटना; पोलीस उपअधीक्षकांनी ताब्यात घेऊन केली कारवाई
नेवासा – छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जाणारी एस.टी. महामंडळाची बस शनिवार (दि.१०) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नेवासा बसस्थानकात आली. त्याच बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने चक्क दुसऱ्याच प्रवाशाची बॅग उचलून पळून जात असताना चांगलीच आरडाओरड झाल्याने नेवाससकरांनी ही बॅग पळवून घेऊन जाणाऱ्या एका इसमाला पकडून चांगलाच चोप देऊन अद्दल घडविली. या घटनेची खबर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना मिळताच त्यांनी तातडीने आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन बॅग चोरणाऱ्याला ताब्यात घेतले. त्याची नेवासा बसस्थानकापासून पोलीस ठाण्यापर्यंत पायी धिंड काढली. त्यामुळे या चोरट्याला बघण्यासाठी नेवासा शहरात चांगलीच तोबा गर्दी उसळली होती.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीला जाणारे एक जोडपे आपल्या लहान मुलासह या बसमध्ये बसलेले होते. त्यांनी आपली बॅग बसमध्ये ठेवलेली असताना ही बस नेवासा आगारात
येताच पाठीमागे बसलेल्या एका प्रवाशाने दुसऱ्याच प्रवाशाची बॅग उचलून पळून जात असताना या जोडप्याने बघितल्यामुळे ‘पकडा -पकडा’ असा आवाज दिल्यामुळे आरडाओरड झाल्यामुळे खाली आजूबाजूला असणाऱ्या नेवासकरांनी या चोरट्याला पकडून चांगलाच प्रसाद दिला. या घटनेची खबर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना मिळताच ‘त्या’ चोरट्याला पकडून त्याला नेवासा पोलीस ठाण्यात आणले.

ज्यांची बॅग हा चोरटा पळून घेऊन जात होता, त्यांनी मात्र, या घटनेची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात न दिल्यामुळे पोलिसांनीच या चोरट्यावर कारवाई केली. हा चोरटा एका चांगल्या कंपनीत नोकरीस होता. मात्र, नोकरी गेल्यामुळे हतबल होवून त्याने संतापाच्या भरातच हे हे कृत्य पहील्यांदाच केल्याचे सांगितले. त्याच्या ते अंगलट आले आणि पोलिसांनी या चोरट्यावर कारवाई करुन त्याला चांगलीच अद्दल घडविली. या प्रकाराची जोरदार चर्चा शहरात चांगलीच रंगली होती.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.