नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे बहुजन दलित समाजाचे युवा नेते सुनील वाघमारे यांच्या वतीने आयोजित भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्ताने नेवासा तालुक्याचे आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी बुद्धमूर्तीचे पूजन करून अभिवादन केले.भगवान गौतम बुद्धाचे जीवन समाजासाठी प्रेरणादायी असून यशस्वी जीवनासाठी त्यांची शिकवण अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी यावेळी बोलतांना केले. युवा नेते सुनील वाघमारे यांच्या निवासस्थानी आयोजित बुद्ध जयंती निमित्त आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सुनील वाघमारे यांनी बुद्ध वंदना म्हटली.आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्ध चरणी अभिवादन केले.

यावेळी बोलतांना आ. लंघे पाटील म्हणाले की आपल्या थोर विचारांनी आणि उपदेशांनी जगाला नवा मार्ग दाखविण्याचे कार्य भगवान गौतम बुद्धांनी केले. समाजात अभूतपूर्व परिवर्तन आणण्यात आपले महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिले.भगवान गौतम बुद्धांनी जगातील दुःख दूर करण्यासाठी विविध मार्गांचे अनुसरण केले. यासाठी त्यांनी आपले घर सोडले आणि ध्यान आणि तपश्चर्येचा मार्ग अनुभवला.महात्मा बुद्ध एक युग प्रवर्तक होते त्यांनी संपूर्ण विश्वात आपल्या ज्ञानाने ज्योत पेटवली. महात्मा बुद्ध यांना शांती व अहिंसेचे दैवत मानले जाते आज जगाला त्यांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी आयोजक सुनील वाघमारे यांनी भगवान गौतम बुद्धाचे जीवनकार्य आपल्या भाषणातून विषद करतांना त्यांनी आज जगाला युद्धाची नव्हे तर भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले.
लक्ष्मणराव लंघे,अमोल मोरे प्रास्ताविक,आभार दिलीप खंडागळे, कृष्णा साठे,विजय खंडागळे,मेजर खंडागळे, अजित मोरे,मार्कस वाकडे,ऋषिकेश खंडागळे,अरविंद खंडागळे,विजय खंडागळे,मंगलताई वाघमारे,रंजनाताई मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.