पेरणपूर्व शेतीच्या मशागतींना चालना
नेवासा – पुढील १५ ते २० दिवस म्हणजे ३१ मे पर्यत मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सून नव्हे, परंतु मान्सूनपूर्व वीजा, वारा वावटळासहितचा मान्सूपूर्व अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे कदाचित महाराष्ट्रात पेरणीपूर्व शेतीच्या मशागतींना चालना मिळणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

मान्सून केरळात २३ ते ३१ मे दरम्यान दाखल होणार आहे. अंदमान व आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल झालेला मान्सून चांगला कोसळत असून त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार होत आहे. दरम्यान, पुढील १५ ते २० दिवस वावटळासहितचा मान्सूपूर्व अवकाळी पावसाची शक्यता आहे. या अवकाळीच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता असल्याचे खुळे यांनी कळवले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.