नेवासा – भारतीय क्रिकेटर विराट कोहली याने चाहत्यांना एक धक्का दिला आहे. विराट कोहलीने कसोटी निवृत्तीची घोषणा केली आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टेस्ट किक्रेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. विराट कोहलीने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतकांसह ९२३० धावा केल्या. त्याने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याचे काही प्रमुख कसोटी रेकॉर्ड्स असे आहेत:

खेळलेले सामनेः १२३ कसोटी सामने, केलेल्या धावाः ९२३० धावा, सर्वोच्च धावसंख्याः २५४* (नाबाद), फलंदाजीची सरासरी: ४६.८५, शतके: ३०, अर्धशतके: ३१, द्विशतकेः ७ (भारतासाठी सर्वाधिक), भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडूः ६८ सामने, भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजयः ४० विजय, कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके: ‘२० शतके, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा केला असून अनेक ऐतिहासिक विजय मिळवून – देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.