ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
वॉटर पार्क

नेवासा – देश विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वेट एन जॉय पार्कच्या वतीने शिर्डीत येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष योजनेचे आयोजन करण्यात औले आहे. या योजनेनुसार बेट एन जॉय पार्कला येणाऱ्या पर्यटकांना कोणतेही जास्तीचे शुल्क न आकारता – वॉटर पार्कच्या तिकीटासोबत साईतीर्थ थीम पार्कचे तिकीट निःशुल्क देण्यात येणार असल्याची माहिती इमॅजिका वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक जय मालपाणी यांनी दिली.

या योजनेबाबत अधिक माहिती देताना श्री. मालपाणी यांनी सांगितले, शिर्डीत जास्तीत जास्त साईभक्तांनी यावे, इथल्या पर्यटनात वृद्धी व्हावी यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे यावर्षी सोमवार ते गुरुवार असे चार दिवस या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

वॉटर पार्क

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार,
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातून येणाऱ्या साईभक्तांना या योजनेचा लाभः घेता येणार आहे. या योजनेबरोबरच यावर्षी वॉटर पार्कमध्ये अत्याधुनिक अशा आठ नवीन राईड्स उभारण्यात आल्याने पर्यटकांना जास्त वेळ प्रतिक्षाः न करता अधिक राईड्सचा आनंद घेता येत आहे. वॉटर पार्कच्या उभारणीनंतर देशातील पहिले धार्मिक थीम पार्क अशी ख्याती मिळवलेले साईतीर्थ थीम पार्क उभारण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरून उभारण्यातः
आलेल्या व पूर्णतः वातानुकुलीत असलेल्या थीम पार्कलाही देश-विदेशातील साईभक्तांची पसंती लाभली आहे.

वॉटर पार्क

उन्हाळ्याच्या सुट्टीत शिर्डीला वरील जिल्ह्यातील येणाऱ्या पर्यटकांना थीस पार्कचा आनंद घेता यावा म्हणून वॉटर पार्कच्या तिकीटासोबत थीम पार्कचे तिकीट निःशुल्क दिले जाणार आहे. येणाऱ्या काळात जास्तीत जास्त पर्यटकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.

newasa news online
वॉटर पार्क

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वॉटर पार्क
वॉटर पार्क

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वॉटर पार्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *