ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मारहाण

नेवासा – कायद्याचे रक्षण करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पाच पोलिसांनीच चक्क कायदा हातात घेवून भेंडा येथे हॉटेल चालकासह महिलांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेतील स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच पोलिसांची जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तात्काळ चौकशी करुन निलंबित करण्यात यावे अन्यथा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा नेवासा शहरातील फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे नेते अॅड. संजय सुखधान यांनी दिला आहे.

मारहाण

गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी बापूसाहेब फोलाने, आकाश काळे, शिवा ढाकणे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ हे कारवाई करण्यासाठी आले असता या कारवाईत हॉटेलमध्ये पोलिसांना काहीच मिळून न आल्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलीसांनीच उलट हॉटेल चालकाला तू १५ देशी आणि इंग्लीश दारुच्या सिलबंद बाटल्या आणून दे म्हणत चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला आणि मारहाण केली तेंव्हा हॉटेलात कामासाठी असलेल्या दोन महिला पोलिसांना समजावून सांगत असताना पोलीसांनीच उलट या महिलांचे केस धरत काठीने मारहाण केली हा प्रकार पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे काढणारा असून याची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करुन गुन्हे शाखेच्या पाच पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा लवकरच जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा श्री. सुखधान यांनी दिला आहे.

newasa news online
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *