ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
त्रिमूर्ती

नेवासा फाटा – मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री. दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक विद्यालयाने याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक विद्यालय, मुकिंदपूर या विद्यालयाचा एस. एस. सी परीक्षा मार्च 2025 चा निकाल 96.16 % लागला असून कॅडेट तांदळे सिद्धेश सतीश हा 96.40% टक्के मिळवून विद्यालयात प्रथम आला आहे.

त्रिमूर्ती

तर कॅडेट भास्कर मानसी 93.40% द्वितीय, कॅडेट पिटेकर समीक्षा व पटेल अफिना यांनी 92.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादित केला आहे. विद्यालयातून 573 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 551 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.9 विद्यार्थांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.तसेच 132 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत, तर 246 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व विषय शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक साहेबरावजी घाडगेपाटील,अध्यक्षा सुमती साहेबराव घाडगेपाटील ,उपाध्यक्षा स्नेहल चेतन चव्हाणपाटील, सचिव मनीष घाडगे पाटील,विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे, उपप्राचार्य शांतीलाल मेहेत्रे,पर्यवेक्षक संजय सिंह चौहान ,विभागप्रमुख एकनाथ कापसे,नामदेव ताके, राजेंद्र कात्रस,संतोष निंबाळकर,बाळासाहेब साबळे व सर्व विषय शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

त्रिमूर्ती
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

त्रिमूर्ती
त्रिमूर्ती
त्रिमूर्ती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

त्रिमूर्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *