नेवासा तालुक्यातील खुपटी येथील मूर्तिकार रवींद्र शिर्के यांचा मुलगा केतन रवींद्र शिर्के यांनी न्यू इंग्लिश स्कूल,खूपटी या शाळेत एसएससी बोर्ड परीक्षेत शाळेत 93.20 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. केतन हा अतिशय कष्टाळू व अभ्यासू मुलगा आहे. केतन हा वडिलांना मूर्ती कामाच्या व्यवसायात मदत करून अभ्यासही करत होता.घरची परिस्थिती जेमतेम असून, आई वडीलही अडाणी असताना ही केतनने हे दैदीप्यमान यश मिळवल्याबद्दल त्याचे समाजातून कौतुक होत आहे.

त्याच्या या यशाच्या पाठीमागे त्याचे आई-वडील शाळेतील शिक्षक असल्याचे केतनने सांगितले. त्याचे या यशाबद्दल त्यांचे परिविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक संतोष जी खाडे साहेब यांनी पोलीस स्टेशनला बोलवून मुलाचा व त्याच्या पालकांचा सन्मान केला व त्याच्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले…


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.