नेवासा – तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानंच्या स्वमालकीच्या ६० व्यावसायिक गाळ्यांचे ११ महिन्याच्या करारासाठी टेंडर लिलाव पार पडले. यातून देवस्थानला पाच कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. या निधीचा वापर नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुविधा मिळण्यासाठी खर्च करण्यात यावा, असे जिल्हाधिकारी यांनी सुचविले आहे.
शनैश्वर देवस्थानने व्यावसायिकांसाठी ६० गाळे उभारले आहे. दर ११ महिन्यांनी या गाळ्यांचा टेंडर पद्धतीने लिलाव होतो. एका गळ्यासाठी ५० हजार रुपये डिपॉझिट तसेच तेल लिलावासाठी ३० लाख रुपये डिपॉझिट आकारले आहे या लिलावासाठी २४९ व्यावसायिकांनी निविदा भरल्या. देवस्थानला ११
महिन्याच्या लिलावातून तब्बल चार कोटी ९५ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

शनी मूर्तीवर हजारो लीटर तेल भाविक अर्पण करतात. हे तेल स्टोरेज टँक मध्ये साठवले जाते. याच निर्माल्य तेलाची दर ११ महिन्याने लिलावाद्वारे विक्री केली जाते. या तेलासाठी ८८ रुपये किलो प्रमाणे टेंडर अहमदाबाद येथील नवकार प्रोसेस कंपनीने लिलाव घेतले.
गाळ्यांसाठी स्पर्धा
शनिशिंगणापुरात शनि महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू असतो. शनि अमावस्या, गुढीपाडवा तसेच दररोज भाविकांची वाढती गर्दी पाहता येथील व्यावसायिकमध्ये गाळे घेण्यासाठी स्पर्धा आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.