नेवासा – नेवासा ते कुकाणा दरम्यान बसने प्रवास करत असताना महिलेच्या बॅगमध्ये ठेवलेले दागिने व रोख रकमेची पिशवी चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून दोन अज्ञात महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, मंजुश्री सचिन कदम (वय ३५) रा. सुरेगाव ता. कोपरगाव यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, १५ मे रोजी नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथे माहेरी येत असताना सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास नेवासा बसस्टॅण्डवरून नाशिक-शेवगाव बसने प्रवास करत असताना नेवासा ते कुकाणा प्रवासादरम्यान सोने व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असलेली पिशवी लबाडीच्या इराद्याने भेंडा येथून गाडीत बसलेल्या माझ्याजवळ उभ्या असलेल्या दोन महिलांनी चोरुन नेल्याचा संशय आहे.

या पिशवीत ८ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या रिंग, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी, अर्धा ग्रॅमची नथनी, चांदीचे दोन जोड, पायातील चाळ व जोडवे. तसेच रोख रक्कम ७ हजार रुपये होती. हा सर्व ऐवज चोरून नेला.
या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार शहाजी आहेत. आंधळे करत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.