ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
चेअरमन

सोनई – नेवासा तालुक्यातील अग्रेसर असलेल्या घोगरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमनपदाच्या निवडीची सभा एस व्ही ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. सोसायटीच्या चेअरमनपदी दाऊदभाई इज्जतभाई शेख यांची निवड करण्यात आली. चेअरमन निवडीची सूचना संचालिका सौ सविता सुभाष पटारे यांनी मांडली त्यास अनुमोदन संचालक राधकीसन साप्ते यांनी दिले. व्हा चेअरमनपदी भानुदास बाळाजी दरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

व्हा चेअरमन पदाची सूचना संचालक रामदास शिरसाठ यांनी मांडली त्यास दिगंबर पटारे यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक ज्ञानदेव पटारे,मा चेअरमन सतीश पटारे, बशीर शेख,भास्कर घोगरे, बबन प-हाड,दत्तात्रय बहिरट,अनिल प-हाड,सुभाष पटारे, विलास पटारे,सुलतान शेख, नितीन लबडे,बाळासाहेब कडवळे, बाळासाहेब साप्ते,सचिव डी बी बहिरट आदी उपस्थित होते. नवनिर्वाचीत चेअरमन व व्हा चेअरमन यांचे माजी मंत्री शंकरराव गडाख व माजी आ भानुदास मुरकुटे यांनी अभिनंदन केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *