ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
लाउड स्पिकर

नेवासा – पोलीस ठाणे नेवासा हददीतील सर्व सुजान नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, मा. उच्च न्यायालयानें क्रिमिनिल रिट पिटीशन नं ४७२९ / २०२१ या संदर्भात बेकायदेशीर रित्या बसवलेल्या लाउड स्पिकर इत्यादी मुळे होणा-या ध्वनी प्रदुषणाबाबत कायदयाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.या ध्वनी प्रदुषणामुळे (डिजे वादयामुळे) अनेक वुध्द व्यक्ती, लहान मुले, आजारी इसम, विकलांग इसम यांचे आरोग्यास हानी पोहचत आहे. मा. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार डिजे वर बंदी घालण्यात आली असुन पोस्टे हददीत कोणीही यापुढे डिजे वाजवणार नाही याची प्रामुख्याने दक्षता घेतील.

लाउड स्पिकर

तरी यापुढे पोलीस ठाणे नेवासा हददीत विनापरवाना ध्वनी क्षेपक / लाउड स्पीकर लावुन वाजवताना मिळुन आल्यास संबंधीत चालक मालक / आयोजक यांचेवर ध्वनीप्रदुषण अधिनियम २००० मधील तरतुदीच्या अनुषंगाने प्रचलीत कायदयान्वये योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच पोस्टे हददीतील मंदिर, मशिद, मदरसा, चर्च, गुरुद्वार व इतर धार्मिक स्थळे यांनी संबंधीत ठिकाणी परवानगी घेवुनच लाउड स्पिकरचा वापर मर्यादित शासन निर्णयाप्रमाणे करावा.

तसेच सध्या चालु असलेल्या भारत / पाकिस्तान तणावाचे वातारवणामुळे मा.आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग यांचे कडील SID/IG/CS@S/१४SCM/२०२५ १९६२ दिनांक १४/०५/२०२५ अन्वये पोस्टे हददीत कोणीही इसम ड्रोन उडडाण करणार नाही तसेच आढळुन आल्यास संबंधीतावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल .

लाउड स्पिकर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लाउड स्पिकर
लाउड स्पिकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लाउड स्पिकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *