ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
घरफोडी


गणेशवाडी — नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील घरफोडी प्रकरणी येथील विकास बाळासाहेब वैरागर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी दि. १६ रोजी रात्री ९.३०.ते १.३० वाजेच्या दरम्यान फिर्यादी महीला सुरेखा सर्जेराव खाडे या काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या त्याचाच फायदा घेऊन दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत मध्ये प्रवेश करत तिस हजार रुपये किंमतीच्या सहा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या व चाळीस हजार रुपये रोख रक्कम असा सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल वैरागर याने चोरुन नेला असल्याचे दि. १९ रोजी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

घरफोडी

त्यानुसार गुन्हा र. नं. १९५/२०२५ बिएनएस चे कलम ३०५(अ), ३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नानासाहेब तुपे हे करत आहेत.

घरफोडी
घरफोडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घरफोडी
घरफोडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घरफोडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *