ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
वाकचौरे

नेवासा – केंद्र शासनाने ग्रामीण व शहरी भागात विजेच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, वीज गळती कमी करण्यासाठी योजना निर्माण करण्याचे योजिले आहे. या योजनेच्या कामकाजावर लोकप्रतिनिधीचे नियंत्रण व सहभाग ठेवण्याकरिता जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांची व सहअध्यक्षपदी खा. निलेश लंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यपदी ना. राधाकृष्ण विखे पाटील, ना. राम शिंदे, आ. किशोर दराडे, आ. सत्यजित तांबे, आ. शिवाजीराव गर्जे, आ. शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, आ. किरण लहामटे, आ. आशुतोष काळे,

वाकचौरे

आ.रोहित पवार, आ. अमोल खताळ, आ. हेमंत ओगले, आ. विठ्ठल लंघे, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रम पाचपुते व सदस्य सचिवपदी जिल्हाधिकारी पंकज आशिया तर संयोजकपदी अधीक्षक अभियंता महावितरण रमेश पवार यांची नियुक्ती केली आहे. या समितीने केंद्र पुरस्कृत योजनेचा आढावा घेणे व अंमलबजावणी दरम्यान सहनियंत्रण ठेवणे, तीन महिन्यातून एकदा बैठक घेणे, वितरण प्रणाली निर्माण करणे व त्याचे सुव्यवस्थापन करणे, योजनेच्या प्रभावामुळे विजेची गुणवत्ता व विश्वसनीयतेमध्ये सुधारणा करणे, ग्राहक समाधान व तक्रार निवारण करणे आदी कामे करावयाची आहेत.

वाकचौरे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाकचौरे
वाकचौरे
वाकचौरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाकचौरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *