ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
खंडोबा

आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडुन जीवनात करियर करण्याचा प्रयत्न करा-पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे

नेवासा – नेवासा बुद्रुक येथील पुरातन म्हाळसा खंडोबा बानाई  मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते करण्यात आला.आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडुन जीवनात करियर करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी यावेळी बोलतांना केले. यावेळी झालेल्या गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालय ओम शांती केंद्राच्या राजयोगिनी वंदना दिदी हया होत्या तर हभप कोंडीराम महाराज पेचे,भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा भारतीताई बेद्रे, मेजर राजश्री दिदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

खंडोबा

यावेळी म्हाळसा खंडोबा बाणाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजीराव ठाणगे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते शाल व बुके व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी बोलतांना पोलीस उपअधीक्षक खाडे म्हणाले की चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहे,त्यांचा होणारा सत्कार ही अभिमानाची बाब आहे, येथील मुलींसह मुलांनी देखील चांगले यश संपादन केलेले आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दहावी पर्यंत आपले बालवयच असते,आपल्या वाटचालीत आता येथून पुढे खऱ्या कसोटीची सुरुवात झाली आहे, आईवडील यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडुन जीवनात करियर करण्याचा संकल्प करा,आईवडीलांना सन्मानाचे जगणे  कसे जगता येईल यासाठी मनाशी खूणगाठ बांधून यापुढील वाटचाल करा असे आवाहन करून त्यांनी उपस्थित सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

खंडोबा

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी युवा उद्योजक बाळासाहेब मारकळी,माजी उपसरपंच अजित जाधव, शांताराम बोर्डे,प्रकाश उंडे सर,राजेंद्र काशीद,बालू फसले, प्रसाद रहाट,कचरू काळे,सुधीर डौले,शंकर जपे, सुभाष पेचे,कचरू काळे,निलेश जोशी यांच्यासह माता पालक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम संयोजक संभाजीराव ठाणगे यांनी आभार मानले.

खंडोबा
खंडोबा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खंडोबा
खंडोबा
खंडोबा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खंडोबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *