गणेशवाडी – शनिशिंगणापुर गावातील एका हॉटेलचे मालक माजी सरपंच शिवाजी यशवंत शेटे हे आपल्या हॉटेलमध्ये काउंटरवर बसलेले होते. तेव्हा हॉटेलमध्ये आलेल्यां आरोपींनी धारधार वस्तुंनी त्यांना मारहाण करुन दिवसभरातील हॉटेलमध्ये जमा झालेली बावीस ते तेवीस हजार रुपयांची रक्कम घेवुन गेले त्यावरुन शनिशिंगणापुर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नं- ११६/२०२५ बिएनएस चे कलम ११९(१),११८(१),१९१(२),११५ (२) गुन्हा दाखल होता. अशातच फरार आरोपींच्या मागावर पोलीस असताना आरोपींपैकी अशोक उत्तम फुलमाळी रा. चांदा हा सोनई ते घोडेगाव रोडवर असलेल्या लोखंडी पुलाजवळ असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली

त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष.शेळके सफौ नितीन.सप्तर्षी, पोलीस हेड काॅस्टेबल रमेश लबडे, पोलीस काॅस्टेबल अजय ठुबे, पोलीस काॅस्टेबल संतोष मुरकुटे तसेच स्था.गु.शाखेचे पोहेकॉ/ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने आरोपुचा शोध घेत असताना गुप्त बातमी च्या आधारे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन वरील गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.त्यास दि. २४ रोजी न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हा घडताच दोन आरोपी चौवीस तासाचे आत अटक करण्यात शनि शिंगणापूर पोलीसांना यापुर्वी यश आलेले आहे.

सदरची कारवाई ही सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.आशिष शेळके , सफौ.नितिन सप्तर्षी, सफौ.नितीन भागवत,स्थानिक गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर शिंदे, कॉ.रमेश लबडे, पोहेकॉ.बालाजी मुसळे, पोकॉ.अजय ठुबे, पोकॉ.संतोष मुरकुटे, पोकॉ.अमोल पोंधे, पोकॉ.सागर शेजुळ, पोकॉ.हेमंत झिने, पोकॉ.संजय हिवाळे यांनी केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.