गणेशवाडी – शनिवार रोजी वाहतुकीचे नियमन न करणाऱ्या व्यक्तींवर शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन समोरील रोडवर दुचाकी,, चार चाकी तथा तत्सम वाहनावर विना नंबर,ट्रिपल सीट,फक्त एका बाजूस नंबर असलेले वाहने, वाहन चालविताना रहदारी असून देखील मोबाईल वर बोलताना मिळून आलेले वाहन चालक तसेच सीट बेल्ट न धारण करणारे वाहन चालकावर आज रोजी मोटार वाहतूक कायद्यान्वये कारवाई केली असता ८० केसेस करून ६९हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

सदर कारवाई करतांना शनि शिंगणापूर येथील सरपंच पती बाळासाहेब बानकर हे देखील वाहन चालविताना कायद्याचे पालन न करता मिळून आल्याने त्यांना पोलिसांनी ते जबाबदार नागरिक असल्याने ताब्यातील वाहन चालतावितांना वाहतुकीचे नियम पाळावे याकरिता विनंती केली .त्याचप्रमाणे जनतेला देखील वाहन चालवितांना त्यांनी वाहन चालविण्याचा परवाना व वाहना संबंधी तत्सम कागदपत्रे आपल्याजवळ अगर आपल्या मोबाईल मध्ये सोबत बाळगावी वाहन चालकांनी पोलिसांना त्यांचे कामकाज करताना त्यांना त्यांचे शासकीय कामकाज करतांना सहकार्य करावे तसेच वाहन चालकांनी त्यांचे वाहन १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांच्या/मुलींच्या ताब्यात देऊ नये असे शनिशिंगणापूर परिसरातील तसेच येणारे भाविक यांना शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन विनंती वजा आवाहन करीत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.