नेवासा – आषाढी एकादशीच्या निमिताने अहील्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या दिंड्या मोठ्या संख्येने आहेत. विविध देवस्थानच्या मानाच्या दिंड्यांचा यामध्ये समावेश असतो.
प्रत्येक गावातून जाणाऱ्या वारकरी बांधवासाठी सर्व ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीत सर्व दिंड्याचे प्रतिनिधी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तातडीच्या उपाय योजना करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना नामदार साहेबांनी दिल्या.
बैठकीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माननीय आमदार पांडुरंग साहेब वेदांताचार्य ह.भ.प.देविदासजी महाराज म्हस्के आ.शिवाजीराव कर्डीले, आ. विठ्ठलराव लंघे,आ.अमोल खताळ जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह वारकरी उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.