ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
ट्रॅक्टर

नेवासा – पोलीस स्टेशन हददीत मौजे बकुपिंपळगांव. ता. नेवासा. जि. अहिल्यानगर या ठिकाणी दिनांक. २७/०५/२०२५ रोजी रात्रौ १२/२० वा ते दिनांक. २८/०५/२०२५ चे सकाळी.०६/०० वा.चे. दरम्यान फिर्यादी नामे गणेश पोपट शिंदे वय ३२ वर्षे रा. बकुपिंपळगांव ता नेवासा यांचे घरासमोरुन पत्राचे शेडमधुन स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केले बाबत फिर्यादी यांचे तक्रारीवरुन नेवासा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५४०/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा कलम. ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

ट्रॅक्टर

सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे नेवासा श्री. संतोष खाडे, परि. पोलीस उपअधीक्षक यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक यांना सदर गुन्हयांचे बाबत मार्गदर्शन करुन रवाना केले असता गुन्हे शोध पथक हे आरोपीचा तांत्रिक विश्लेषण, खब-या मार्फत शोध घेत असताना माहिती मिळाली की, सदर चोरी झालेला ट्रॅक्टर हा विक्री करण्यासाठी प्रवरासंगम परिसरात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथक यांनी प्रवरासंगम परिसरात सापळा लावला असता रात्रौ ०९/०० वा.चे. सुमारास सदर स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर हा एका टाटा एसी कंपनीच्या मालवाहु गाडीमध्ये असल्याचे निर्देशनास आले असता सदर टाटा एसी कंपनीची मालवाहु चारचाकी गाडी ही पोलीसांची चाहुल लागताच प्रवरासंगम वरुन सिध्देश्वर मार्गे पळुन गेली

ट्रॅक्टर

सदर गाडीचा गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन सिध्देश्वर गोधेगांव भालगांव शिवारात पकडली असता गाडीमधील इसम यांना पोसई पाटील यांनी नाव, गाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे १) मयुर संजय भोसले वय २० वर्षे रा. कासारवाडी. ता. पाथर्डी.जि. अहिल्यानगर २) महेश ज्ञानेश्वर मुजमुले वय २० वर्षे रा. जवखेडे.ता. पाथर्डी ३) महेश अशोक बारुडे वय २७ वर्षे रा. प्रवरासंगम ता नेवासा ४) रविंद्र मारकस मोरे वय २४ वर्षे रा. बकुपिंपळगांव. ता. नेवासा ५) प्रणव कृष्णा पवार वय २२ वर्षे रा.प्रवरासंगम ता. नेवासा ६) दुर्गेश बाबासाहेब बेडकर वय १९ वर्षे रा. प्रवरासंगम ता नेवासा असे सांगुन सदर टाटा एसी कंपनीची मालवाहु चारचाकी गाडीचे पाठीमागील हौदयामध्ये असलेल्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर ट्रॅक्टर हा नमुद गुन्हयांतील फिर्यादी यांचे घरासमोरील पत्राचे शेडमधुन चोरी केले बाबत कबुली दिली.

ट्रॅक्टर

सदर स्वराज कंपनीचा एम एच १७ सी एक्स ७३५६ किंमत अंदाजे २,६५,००० /- रु किंमतीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर तसेच टाटा एसी कंपनीची गाडी नं एम एच १६ सी.डी.४९४४ किंमत अंदाजे ४,००,०००/- रुपये असे एकुण ६,६५,०००/- हजार रुपये किंमतीचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करुन नमुद आरोपी यांना सदर गुन्हयांमध्ये अटक करण्यात आली असुन सदर गुन्हांचा पुढील अधिकचा तपास गुन्हे शोध पथकांचे पोसई विकास पाटील हे करत आहेतसदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे सो, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. वैभव कुलबुर्गे सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर विभाग, श्री. सुनिल पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री. संतोष खाडे, परि.पोलीस.उप.अधीक्षक, पोसई विकास पाटील, पो.हवा. अजय साठे, पो.कॉ आप्पासाहेब तांबे, सुमित करंजकर, अवि वैदय, नारायण डमाळे, श्रीनाथ गवळी, राम वैदय, भारत बोडखे, गणेश जाधव सायबर सेल श्रीरामपुर चे पो.हवा. सचिन धनक यांचे पथकाने केली आहे.

ट्रॅक्टर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ट्रॅक्टर
ट्रॅक्टर
ट्रॅक्टर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ट्रॅक्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *