गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सुमारे चार ते पाच तास वाहतुकीचा फज्जा उडाला. त्यात शुक्रवार बाजार दिवस या ठिकाणी जनावरे खरेदी विक्री साठी मोठ्या प्रमाणात ये जा असते. या महामार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले होते ते बुजविण्याचे काम देखील ठेकेदाराने ऐन बाजार दिवशीच सुरू केले. त्यामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. ऐन बाजार दिवस तसेच मोठी रहदारी अगोदरच दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूकीचा बोजावारा उडत असतो. या ठिकाणी वाहतूक शाखेचा अवघा एकच पोलीस कर्मचारी उपस्थित असतो.

या ठिकाणी असलेल्या शनी चौकात सिग्नल बसविण्याची मागणी या निमित्ताने होत आहे. दर शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी हमखास वाहतूक ठप्प होते. त्यामुळे स्थानिक पोलीसांनी या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी असलेली पोलीस चौकी फक्त एक शोभेची वास्तु बनली आहे. शेवटी दिवसभर सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी तसेच पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांचे मार्गदर्शनाखाली सुमारे पंधरा कर्मचारी वाहतूक सुरू करण्याचे काम उशिरापर्यंत करत होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.