पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील एकूण ११ महसूल मंडळांपैकी अनेक शेतकरी हे पंतप्रधान पीक विमा योजना खरिप २०२४ मध्ये वंचित राहिलेले आहेत .अशा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून नेवासा तालुका शेतकरी संघटनेने सर्व वंचित शेतकऱ्यांची प्रकरणे जमा केली .त्यानंतर सर्व शेतकऱ्यांची सविस्तर यादी करून कृषी कार्यालय येथे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून सुमारे २६५ प्रकरणे सुपूर्त करण्यात आली .
यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर वेळेवर ऑनलाईन तक्रार करून देखील त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही .तसेच काही शेतकऱ्यांना नाममात्र भरपाई मिळालेली आहे .

यापैकी काही विमाधारकांच्या आधार सीडींच्या बचत खात्याच्या अडचणींमुळे सुद्धा रक्कम प्राप्त झालेली नाही .अशा अनेक अडचणींवर मात करण्याकरता शेतकरी संघटनेने २६५ शेतकऱ्यांची यादी करून व त्यांची सविस्तर प्रकरणे कृषी अधिकारी आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी यांना दिलेली आहेत .यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचा वैयक्तिक मागवा शेतकरी संघटनेतर्फे घेण्यात येणार आहे .
यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर ,तालुकाध्यक्ष अशोक काळे ,प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र काळे,युवा अध्यक्ष डॉ रोहित कुलकर्णी , तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे ,कायदेशीर सल्लागार एडवोकेट बाळासाहेब कावळे,एडवोकेट ज्ञानेश्वर शिरसाठ,एडवोकेट सागर सागडे,किरण लंघे,सोमनाथ औटी,अशोक नागोडे ,दत्तात्रय निकम,बाबासाहेब नाबदे ,अशोक तांबे , दौलतराव शिंदे, योगेश शिरसाठ,भास्कर तुवर,कैलास पवार आदि शेतकरी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.