ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गुन्हा

नेवासा – २०२३-२४ च्या हंगामात ८७ क्विंटल ४० किलो विकलेल्या सोयाबीनचे ४ लाख ३२ हजार ६५० रुपये थकल्याने शेतकऱ्याने अखेर शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी ब्राम्हणी (ता. राहुरी) येथील ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन मच्छिंद्र ठुबे, अनिल रखमाजी हापसे, किरण चांगदेव कदम, छाया दत्तात्रय कातोरे, कविता रमेश हापसे आणि विठ्ठल छगन ठुबे (सर्व रा. ब्राम्हणी) अशी त्यांची नावे आहेत.

गुन्हा

याबाबत कांगोणी येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी गोरक्षनाथ त्रिंबक साळुंके (वय ५३) यांनी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, साळुंके यांनी २०२३-२४ च्या हंगामात ८७क्विंटल ४० किलो सोयाबीन उत्पादन घेतले. १६ एप्रिल २०२५ रोजी कंपनीच्या व्यवस्थापक कविता रमेश हापसे यांच्याशी चर्चा करून ५ हजार रुपये प्रति क्विंटल दराने त्यांनी ग्रीनअप फार्मर कंपनीस सोयाबीन विकले. मात्र, वारंवार मागणी करूनही संबंधितांनी पैसे दिले नाहीत. अखेर साळुंके यांनी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार दत्तात्रय पवार पुढील तपास करीत आहेत.

गुन्हा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *