नेवासा – दिनांक. ०२/०६/२०२५ रोजी नेवासा शहरातील भराव गणपती परिसर कसाई मोहल्ला ता नेवासा येथे अवैध कत्तलखाने असले बाबत नागरीकांचे विविध तक्रारी प्राप्त होत्या त्याअनुषंगाने नगरपंचायत विभाग नेवासा व पोलीस ठाणे नेवासा यांचे संयुक्त विदयमाने सदर भराव गणपती परिसरात असलेले कसाई मोहल्ला येथील अवैध कत्तलखाने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उध्दवस्त करण्यात आले आहे.
सदर कत्तलखाने उध्वस्त केल्याने यापुढे होणारी गोवंशीय हत्या यावर आळा बसणार असुन तरीही कोणी सदर अवैध कत्तलखाने चोरुन लपुन सुरु केल्यास तसेच गोवंशीय अवैध वाहतुक केल्यास त्यांचेवर कठोर प्रचलित कायदयान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे नेवासा, नगरपंचायत विभाग यांचेकडुन करण्यात येत आहे.

सदर कत्तलखाना उध्वस्त कारवाई श्री. संजय बिराजदार, तहसिलदार नेवासा, श्री. संतोष खाडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नेवासा पोस्टे, श्री. लांडगे, नगरपंचायत कार्यालय नेवासा यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.