नेवासा : येथील श्री चक्रधर स्वामी देवस्थानच्या वतीने पंचवतार व संन्यास दिक्षा विधी सोहळा नेवासाफाटा येथील सुयोग मंगल कार्यालयामध्ये महानुभाव पंथाच्या आचार्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नेवासा येथील समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिह घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आले. श्री चक्रधर स्वामी देवस्थानचे संचालक महात्मा शाममुनी अंकुळनेरकर यांचे शिष्य धर्मकुमार धनंजय कराळे व धर्मकुमारी कीर्ती वाकडे यांचा संन्यास दिक्षा सोहळा महानुभाव पंथातील जेष्ठ आचार्य उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र नेवासा नगरीला पुरातन वारसा लाभलेला आहे. संतांच्या व ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे. या नेवासा शहरात आठशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आले होते. त्यांनी महाराष्ट्रात आठ ठिकाणी दिवाळीचा सण साजरा केला.
त्यापैकी सहावी आनंदाची दिवाळी याच नेवासा तीर्थक्षेत्री त्यांनी भक्त जनांसमवेत साजरी केली होती.
दोन दिवशीय पंचवतार उपहार विधी व संन्यास दिक्षा विधी सोहळयाच्या प्रसंगी श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आम्नायआचार्य प.पु.प.म.श्री. गुफेकर बाबाजी महानुभाव, महानुभाव मठ सातारा येथील प.पु.प.म. श्री. सैंगराज दादाजी बिडकर, भोसे ता. करमाळा येथील किर्तनवीर प.पु.प.म.श्री. दत्तराज बाबा शेवलीकर, कात्रड जि.अ.नगर येथील विजयराज दादा परंडेकर, नेवासा येथील श्री रामकृष्ण स्वामी विवेकानंद आश्रमाचे प्रमुख बालब्रम्हचारी श्री ज्ञानेश्वरजी महाराज व अनेक साधू संत मंडळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भानसहिवरा येथील शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी श्री. आवेराजजी महाराज यांनी भेट दिली. देवस्थानचे संचालक महात्मा शाममुनी अंकुळनेरकर यांनी आलेल्या महानुभाव पंथाच्या सर्व संतांचे स्वागत केले या प्रसंगी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.