ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
कृषी


सोनई – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषि महाविद्यालय, सोनई येथील कृषिकन्या नेवासा तालुक्यातील झापवाडी गावात दाखल झाल्या आहेत. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात कृषिकन्या शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.

उपसरपंच तुकाराम जरे ग्रामसेवक अशोक गुडधे , मुळा बँक संचालक उत्तम शिरसाठ , लक्ष्मण गेनू जरे , कचरू जरे, संदीप जरे, पांडुरंग जरे, हरी श्रीधर जरे, बंटी जरे , श्रीकांत नानासाहेब वाघ व इतर गावकऱ्यांनी कृषिकन्यांचे स्वागत केले.

कृषी

या कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या प्रत्यक्ष गावामध्ये सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, साक्षरतेचे प्रमाण, संबंधित गावातील पीकपद्धती, नैसर्गिक संसाधने इत्यादी विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना माती व पाणी परीक्षण, विविध पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार आहेत

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले, कार्यक्रम अधिकारी , डॉ. निर्मला विधाते , डॉ.संतोष चौघुले , प्रा.श्रीकृष्ण हुरुळे व इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती कृषिकन्यांनी दिली.

या वेळी कृषिकन्या दिप्ती हिवाळे, विद्या हुंडारे, वैष्णवी जाधव , ज्योती काळे , ननवरे सिद्धी ननवरे या विद्यार्थिनी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत

कृषी
कृषी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषी
कृषी
कृषी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *