ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शिंगणापूर

शनिभक्त विशाल सुरपुरिया यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी,अन्यथा उच्य न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार,
सोनई/शनिशिगणापूर- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनि शिंगणापूर येथील भगवान शनि देवांच्या ऑनलाइन पूजा व तेल अर्पणासाठी शनैश्वर देवस्थानच्या अधिकृत अॅप ऐवजी तेथील काही कर्मचाऱ्यांनी बनावट ॲप तयार करून भक्तांकडून कोट्यावधी रुपयांची देणगी लाटली आहे. भाविकांच्या भावनांशी संबंधित कर्मचाऱ्यांनी खेळ करून फसवणूक केली आहे. या भ्रष्ट कर्मचाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच त्यांच्या संपत्तीची व मालमत्तेची चौकशी करून कडक शासन करावे. पोलीस प्रशासनाने जर तातडीने कारवाई केली नाही तर या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा भाजपचे कार्यकर्ते विशाल सुरपुरीया यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे.

शिंगणापूर

शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन देणगीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल अॅपचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आला आहे. मात्र अद्याप कोणावरही करवाई झालेली नाहीये. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या संबधित कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायद्याने कारवाई करण्याची मागणी भापजचे कार्यकर्ते विशाल सुरपुरीया यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी सिए गौरव गुगळे उपस्थित होते. सुरपुरिया यांनी दिलेल्या निवेदना बरोबर बनावट अॅपचे पुरावे जोडले आहेत.

शिंगणापूर


विशाल सुरपुरीया यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शनिशिंगणापुर हे भारतातील खुप मोठे देवस्थान असून सर्व शनिभक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. सध्याच्या धावपळीच्या काळात सर्व भाविकांना प्रत्याक्षात येथे येऊन पूजा व तेल अर्पण करणे शक्य नसल्याने देवस्थाने आधुनिक काळा बरोबर चालत ऑनलाईन पूजाविधी साठी व देणगीसाठी एका मोबाईल अॅपची निर्मिती केली होती. याबाबत मला माहिती मिळाली असता मी जेव्हा मोबाईलमध्ये सादर अॅप डाऊनलोड केले त्यावेळी देवस्थानच्या अधिकृत अॅप एवजी अनेक बोगस अॅप दिसले. देवस्थानने अधिकृत अॅप आधीच बंद केले असून तसे जाहीरही केले आहे. त्यामुळे ऑनलाईन पूजाविधी साठी भाविक अद्यापही सदर बनावट अॅपचा वापर मोठ्याप्रमाणात करत आहेत. या बनावट अॅपची निर्मिती देवस्थान मधील काही कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणामध्ये देवस्थानातील कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी वर्ग सामील आहेत.

शिंगणापूर


सदर बनावट सुमारे १० पेक्षा अधिक आहे प्रत्येकी एक ॲपचे सदस्य सुमारे २ ते ३ लाखांपेक्षा जास्त असून त्याद्वारे शनिभक्तांकडुन आकारली जाणारी प्रती पुजा व तेल अर्पण सेवेपोटीची रक्कम रु. १५०० ते २००० गृहीत धरल्यास कमीत कमी ४०० ते ५०० कोटी रुपयांची लुट सदर बोगस ॲपद्वारे शनिभक्तांची झालेली आहे. हे ॲप अद्यापही सुरु असल्याने भोळ्या भाबड्या शनिभक्तांची लुटमार करून मोठा विश्वासघात होत आहे.

वरील परिस्थितीचे अवलोकन करुन श्री शनैश्वर देवस्थानच्या नावाने खोटे व बोगस ॲपची निर्मिती करुन त्याद्वारे ४०० ते ५०० कोटी रुपयांची आर्थिक लुट व अपहार झाल्याबाबत देवस्थानची, देवस्थानामधील सर्व कर्मचारी व सर्व वरिष्ठ अधिका-यांची सखोल चैाकशी करावी. तसेच सर्वांच्या संपत्तीची व मालमत्तेचीही चैाकशी करुन संबंधित ॲप निर्मितीमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करुन संबंधितांना कठोर शासन करावे, अशी मागणी केली आहे.

याबाबत आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समक्ष चर्चा करणार आणि ते न्याय देतील – तक्रारदार विशाल सुरपूरिया भाजपा कार्यकर्ते.शनीभक्त भाविक

newasa news online
शिंगणापूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिंगणापूर
शिंगणापूर
शिंगणापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिंगणापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *