ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
अक्षय जाधव

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील अक्षय प्रकाश जाधव याने इंडियन आर्मी हीस्टोरीक रन व नगर सायकलींग क्लब यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रनींग स्पर्धेत भाग घेत २१ किलोमीटर मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धा १ जून रोजी भुईकोट किल्ला आर्मीच्या प्रगनात नुकतेच पार पडल्या,या स्पर्धा पक्त व्यायामाला प्रोत्साहन देण्यासाठी भरविण्यात आल्या होत्या.त्यात ३,५,१०,२१ व ४२ किलोमीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या सर्व स्पर्धेत जवळपास जिल्ह्यातून २२८० स्पर्धकांनी भाग घेतला होता.२१ रनींग किलोमीटर स्पर्धेत ३५० खेळाडू सहभाग घेतला होता.

अक्षय जाधव

त्यात अक्षय जाधव याने हे २१किलोमीटरचा टप्पा १तास ३६मिनिटे ५५सेकंद वेळात पार करून जिल्हास्तरीय मध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल गुडमॉर्निंग ग्रुपच्या व पाचेगाव ग्रामस्थांच्या वतीने अक्षय जाधव याचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
अक्षय हा पाचेगाव येथील गुडमॉर्निंग ग्रुपचा सदस्य असून गेल्या दीड वर्षांपासून हा ग्रुप पहाटेच्या वेळेस धावणे व सायलींग सराव करून जिल्ह्यात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होऊन कोणत्या न कोणत्या प्रकारे बक्षिसे प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असतो.या गुडमॉर्निंग १५ ते २० तरुण वर्ग समाविष्ट आहे.त्यामध्ये ते व्यायामा बरोबर धार्मिक व पर्यटक स्थळांना भेटी देत आले आहे.
गुडमॉर्निंग ग्रुपचे डॉ वाल्मिक तुवर,भास्कर शिंदे,गणेश माकोणे, संतोष तुवर,ज्ञानेश्वर श्रीरसागर,योगेश तुवर,नामदेव तुवर,अभिषेक तुवर,अक्षय जाधव,तुषार जाधव, राहुल तुवर,गणेश पवार,भानुदास मगर,बाबूराव तुवर आदी तरुणांनी अक्षय यांचे अभिनंदन केले आहे.

अक्षय जाधव
अक्षय जाधव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अक्षय जाधव
अक्षय जाधव
अक्षय जाधव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अक्षय जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *