नेवासा –तालुक्यातील जेऊर गाव येथे कृषि महाविदयालय भानसहिवरेच्या कृषिदूताचे आगमन झाले आहे. पुढील तीन महिन्यासाठी ते गावात वास्तव्यात राहून ते शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक मार्गदर्शन करणार आहेत या कृषीदूतांचे जेऊर येथे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले मार्गदर्शक कृषि महाविदयालय भानसहिवरे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरमटमट सर व तसेच कार्यक्रम समन्वय प्रा. मनोज माने सर व कार्यक्रम आधिकारी प्रा. संदीप सोनवणे सर असून् या गावामध्ये कृषिदूत. बाचकर सागर, गडधे प्रज्वल घाडगे महेश, टेडंबे सार्थक, आणि दहातोडे अथर्व हे विद्यार्थी आहेत. या कृषीदूतांचे जेऊर गाव येथे ग्रामपंचायत व शेतकऱ्याच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी गावाचे सरपंच श्री. महेश आण्णासाहेब म्हस्के व ग्रामविकास अधिकारी श्री नामदेव काटे यावेळी ग्रामपंचायचे क्लार्क श्री. गवारे डि.एस. तसेच गावचे शेतकरी श्री. जनार्दन साहेबराव म्हस्के, सर्जेराव वामन ताके.. सौ. रोख शफिका बाबु. आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.