ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
खाडे

अवैधरित्या गोमास विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल..

नेवासा – आज दिनांक. 13/06/2025 रोजी पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री संतोष खाडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे नेवासा खुर्द नाईकवाडी मोहल्ला येथे इसम नामे आवेज अयाज शेख हा त्याच्या घराच्या आडोशाला गोवंशिया मासाची विक्री करत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस स्टाफ यांना सदर माहितीचा थोडक्यात आशय सांगून रवाना केले असता सदर पोलीस स्टाफ व पंच असे नाईकवाडी मोहल्ला नेवासा खुर्द या ठिकाणी गेले असता तेथे एक पुरुष खाली बसलेला होता व त्याच्यासमोर दोन ते तीन इसम पिशवी घेऊन उभे होते.

खाडे

सदर वेळी पोलीस स्टाफ व पंचासह मिळाले बातमी प्रमाणे छापा टाकून सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आवेज अयाज शेख रा. नेवासा खुर्द असे सांगून त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात अंदाजे. 130 किलो गोवंशीय जातीचे 13,000 /- रुपये किमतीचे गोमास मिळून आले. सदर गोमास पंचासमक्ष जप्त करून सदर इसमाविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे यांचे फिर्यादीवरून प्रचलित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खाडे


सदरची कामगिरी श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कुलबर्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग, श्री सुनील पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शना खाली पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री संतोष खाडे, परिविक्षादिन पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे, पोलीस कॉन्स्टेबल अवि वैद्य, पोलीस कॉन्स्टेबल भारत बोडके, पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर दहिफळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे यांच्या पथकाने केली आहे..

खाडे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खाडे
खाडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *