ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
संतोष खाडे

नेवासा — नेवासा पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत अनेक अधिकारी आले आणि गेले, मात्र प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष जी खाडे यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून एक वेगळीच छाप सोडली. त्यांच्या नेतृत्वाखाली नेवासा परिसरात शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि जनतेशी जवळीक अशा अनेक सकारात्मक गोष्टींचा अनुभव नागरिकांना आला.

संतोष खाडे साहेबांचा नेवासातील कार्यकाळ आता संपत आला असून, त्यांनी “एक अधिकारी कसा असावा” हे आपल्या वर्तणुकीतून दाखवून दिले. त्यांच्यातील प्रामाणिकपणा, तत्परता आणि सामान्य जनतेशी संवाद ठेवण्याची शैली अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

संतोष खाडे

त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, रविवार दिनांक १५ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, प्रणाम हॉल, नेवासा येथे एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नेवासेकर नागरिकांच्या वतीने आयोजित केला असून, सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सत्कार समारंभात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि इतरांनाही उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

newasa news online
संतोष खाडे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संतोष खाडे
संतोष खाडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संतोष खाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *