ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गुन्हा

नेवासा – दिनांक. 14/06/2025 रोजी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संतोष खाडे, परि.पोलीस. उपअधीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे नेवासा ते कुकाना रोडने वाहन क्रमांक.MH 25 P 5601 यामध्ये विदेशी दारू वाहतूक होत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस स्टॉप व पंच असे नेवासा ते कुकाणा रोडवर सदर संशयित वाहनाचे रेखी करत असताना नेवासा बाजू कडून कुकानाकडे सदर वाहन दिसले त्यास थांबून वाहनामधील चालकास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव. किरण शामराव पाटील वय.44 वर्ष रा. श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर असे सांगून सदर वाहनाचे पाठीमागील शटर पंचा समक्ष उघडून पाहणी केली असता त्यामध्ये विदेशी कंपनीचे देशी दारूचे बॉक्स मिळून आले

गुन्हा

सदर विदेशी दारू बाबत विचारणा केली असता चालकाने उडवा उडवी चे उत्तरे दिल्याने पंचा समक्ष सदर वाहनातील विविध कंपनीची विदेशी दारूचे एकूण. 1082 बाटल्या किंमत.1,28,496/- रुपये, टाटा कंपनीची जीप किंमत. 1,50,000/- असे एकूण किंमत. 2,78,496 किमतीचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला असून सदर बाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे..
सदरची कामगिरी श्री सोमनाथ घागरे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कुलबर्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री सुनील पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली श्री संतोष खाडे, परी. पोलीस.उपअधीक्षक, पोलीस हवालदार शहाजी आंधळे, पोलीस नाईक बाबा वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल हरी धायतडक, पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ यांचे पथकाने केली आहे…

गुन्हा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *