नेवासा : नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे सामुदायिक रित्या कै. साहेबराव घाडगे पाटील यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली. बेलपिंपळगाव चे सरपंच किशोर गारुळे यांनी श्रद्धांजली पर सांगितले शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे पाटील सारखं नेतृत्व, कर्तृत्व आणि दा्तृत्व होणे नाही. साहेबांनी ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा आणली. उजाड माळरानावर खडकावर माळरान उभा केला. मुले म्हणजे देवा घरची फुले. चिखलाच्या गोळ्याला कुंभाराणे आकार देऊन सुबक मूर्ती निर्माण करावी तसे कच्च्या बच्च्या मुलांना मुलींना पायावर उभे केले. सैनिकी पद्धती च्या शाळा काढून देशासाठी सैनिक निर्माण करण्याचे आणि राष्ट्र उभारणी करिता योगदान दिले. अश्या महामानवाचे महानिर्वाण झाले. शरीराने जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्यातून विचारातून ते अमर आहेत. घाडगे पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. मी बेलपिंपळगाव चा सरपंच किशोर गारुळे गावचा प्रथम नागरिक या नात्याने ग्रामस्थ यांच्या वतीने घाडगे पाटील यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

योगेश शेळके यांनी श्रद्धांजली पर सांगितले की ज्ञानाचे चालते बोलते व्यासपीठ म्हणजे घाडगे पाटील होते. कर्म हिच पूजा मानून अंतिम श्वास घेईपर्यंत संस्थेच्या कार्यात मग्न असणारे कर्मवीर म्हणजे शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे पाटील होत.
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान घोगरगाव विद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य संतोष जावळे यांनी साहेबांच्या विविध आठवणी सांगितल्या. गेल्या तीस वर्षात ग्रामीण भागात लाखो विध्यार्थी यांचे भवितव्य घडवणारे तेजस्वी सूर्य मावळला. एक युगाचा अस्त झाला. असा युगपुरुष होणे नाही. आमच्या संस्थेचे छत्र बापमाणूस आदरणीय कै. साहेबराव घाडगे पाटील म्हणजे अढळ तारा निखळला, अतिशय जड अंतःकरणाने मी विद्यालयाचे सर्व अध्यापक, कर्मचारी वृंद यांच्या वतीने आदरांजली अर्पण करतो. या वेळी गणेश चौगुले म्हणाले की झालेत बहू, होतील बहू, परी या सम हा शिक्षण महर्षी होणे नाही. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे सर्व घटिका यंत्र जैसे, परीभ्रमेगा! विश्वासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगाच्या कल्याणसाठी विद्यालय उभे करणारे साहेब होते.

तिमिरातून तेजाकडे म्हणजे अंधारातून प्रकाशकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे समाजाला घेऊन जाण्याचे अद्वितीय कार्य करणारे शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे पाटील होते.
या वेळी सरपंच किशोर गारुळे, प्राचार्य संतोष जावळे,प्रा. किशोर गटकळ, ,मा.सोसायटीचे मा. चेअरमन राजेंद्र गायकवाड, बाबासाहेब रोटे, कैलास शिंदे, नितीन भद्रे, शिवाजी माने, शिवाजी गटकळ,दत्तात्रय शिंदे, दत्तूभाऊ पटारे, दिलीपराव लंघे, योगेश शेळके, महेश सरोदे, चंद्रकांत सरोदे, संजय कोठुळे, ज्ञानेश्वर कदम, वसंतराव कांगुणे, सतिष तऱ्हाळ,विजय राहिंज आदी उपस्तित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.