ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
जनावर

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुटका करण्यात आली. या बाबत सविस्तर माहिती अशी की मा. पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्या आदेशान्वये पोनि/.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, बिरप्पा करमल, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल लोटके, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, आकाश काळे, बाळसाहेब गुंजाळ, रविंद्र घुंगासे व उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
दि१७ रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, फिरोज रशीद शेख, रा.कृष्णानगर, घोडेगाव, ता.नेवासा व पापा कुरेशी, रा.आळेफाटा, ता.जुन्नर, जि.पुणे यांनी मिळून घोडेगाव येथे गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने निदर्यतेने डांबुन ठेवले आहेत.

जनावर

पथकाने मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी छापा टाकला असता घटनाठिकाणी काही इसम दोन ट्रकमध्ये गोवंश जिवंत जनावरे भरताना दिसून आले व एका टेम्पोमध्ये जनावरे भरलेले मिळून आले.पथकाने घटनाठिकाणावरून निलेश रामकृष्ण शिंदे, वय ३५, रा.उंबरगाव, ता.श्रीरामपूर, शाहरूख शमशुद्दीन शेख, वय २५, रा.जुनी पेठ, घोडेगाव, ता.नेवासा, 3) भारत भाऊसाहेब शहाराव, वय ३६, रा.फत्तेपुर, ता.नेवासा, यांना ताब्यात घेण्यात आले.
घटनाठिकाणावरून १७,००,०००/- रू किं.त्यात ट्रक क्रमांक एमएच-२३-एयु-५५२३, १५,००,०००/- रू किं.त्यात टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच-१६-सीडी-४८७७, ३०,००,०००/- रू किं., ट्रक क्रमांक एमएच-१६-एई-५४८४, ५,००,०००/- रू किं.मारूती कार क्रमांक एमएच-०५-बीएस-२८९८.३,००,०००/- रू किं.त्यात मारूती सुझुकी अल्टो कार क्रमांक एमएच-१४ईयु-१९३७, २२,९०,०००/- रू किं.त्यात 42 गोवंशीय लहान मोठी जनावरे असा एकुण एक कोटी दोन लाख नव्वद हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जनावर

आरोपीकडे गोवंश जनावरांबाबत विचारपूस केली असता सदरची जनावरे फिरोज रशीद शेख, रा.कृष्णानगर, घोडेगाव, ता.नेवासा (फरार) ,पापा कुरेशी, रा.आळेफाटा, ता.जुन्नर, (फरार) यांचे मालकीची असून त्यांचे सांगणेवरून जनावरे ही कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले . आरोपीविरूध्द सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. २३०/२०२५ महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ५(ब), ९ सह प्राण्यांना निदर्यतेने वागविणेचे कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील गुन्ह्याचा तपास सोनई पोलीस करीत आहेत. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, .वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, . सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

जनावर
जनावर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जनावर
जनावर
जनावर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जनावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *