ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
वेश्या

मा. पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी

नेवासा – मा.श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

वरील नमुद आदेशाप्रमाणे मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्री. संतोष आ खाडे हे शेवगांव शहरात विशेष पोलीस पथकासह अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना काल दिनांक १७/०६/२०२५ रोजी २१/०० वा चे सुमारास त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शिवनगर शेवगाव, ता. शेवगाव याठिकाणी १) शबाना सैय्यद पठाण व २) गणेश लक्ष्मण शिंदे असे महिलांकरवी कुंटणखाना (वैश्या व्यवसाय) चालवीत आहे. सदर ठिकाणी पुरुष इसम व महिला मिळुन येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ श्री. संतोष आ. खाडे, परि. पोलीस उपअधिक्षक यांनी मा. पोलीस अधिक्षक सो. यांचे विशेष पोलीस पथक व पंच आणि महिला पोलीस अंमलदार यांना बोलावुन त्यांना थोडक्यात बातमीचा आशय समजावुन सांगुन मिळालेल्या माहिती प्रमाणे रवाना झाले.

वेश्या

नमुद बातमीठिकाणी पोलीसांचे पथक हे काही अंतरावर जावुन थांबले व त्यांचे पथकातील एका पोलीस अंमलदारास मा.परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्री. संतोष आ. खाडे यांनी बनावट ग्राहक म्हणुन मिळालेल्या माहिती ठिकाणी पाठवीले असता सदर पोलीस अंमलदार यांनी तेथे जावुन फोनद्वारे कळवले की, एका इसमाने त्यांना एक महिला शरिरसंबंध करण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. त्यावरुन पोलीस पथक व पंच अशांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता तेथे गणेश लक्ष्मण शिंदे, वय-३५ वर्षे, रा. शिवाजीनगर शेवगांव, ता. शेवगांव असा मिळुन आला त्याने सदरचा कुंटणखाना (वैश्या व्यवसाय) हा शबाना सय्यद पठाण, रा. नेवासा रोड, शेवगांव, ता. शेवगांव असे दोघे मिळुन चालवीत असल्याचे सांगीतले. तेथे असलेल्या खोल्यांची पोलीसांनी पंचांसमक्ष पाहणी केली असता दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी एक पुरुष व एक महिला असे मिळुन आले व तीसऱ्या खोलीमध्ये वैश्याव्यवसायाकरिता एकुण १५ महिला मिळून आल्या. सदर महिलांना विचारपुस केली असता त्यांनी कळवीले की, १) शबाना सय्यद पठाण व २) गणेश लक्ष्मण शिंदे दोन्ही रा. शेवगांव, ता. शेवगांव यांनी आम्हास वैश्या व्यवसाय करुन जास्त पैसे मिळतात असे सांगुन बोलावुन घेतले व ते आलेल्या पुरुष ग्राहकांमार्फत पैसे घेवुन आमच्याकडुन वैश्याव्यवसाय करुन घेतात असे सांगीतले.

वेश्या

त्यावरुन सदर ठिकाणी मिळुन आलेल्या एकुण १७ पिडीत महिलांची तात्काळ सुरक्षीत सुटका करण्यात आली व सदरचा वैश्याव्यवसाय चालवीणारे १) गणेश लक्ष्मण शिंदे, २) शबाना सय्यद पठाण (फरार) दोन्ही रा. शेवगांव, ता. शेवगांव आणि तेथे मिळुन आलेले दोन ग्राहक यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुद्ध शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३८/२०२५ बि.एन.एस. २०२३ चे कलम १४३ सह पिटा अॅक्ट कलम ३,४,५,७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापुढेही जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अवैध व्यवसाय करणाऱ्या विरोधात अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असुन अवैध व्यवसाय/धंद्याबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

वेश्या

सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर विभाग, श्री. सुनिल पाटील सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. शेवगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखली परि. उपविभा. पोलीस अधिकारी श्री. संतोष खाडे, अहिल्यानगर शहर विभाग, पोसई राजेंद्र वाघ, पोहेका ३७६ शंकर चौधरी, पोहेकॉ / ९८१ दिनेश मोरे, पोहेकॉ/८८५ भिंगारदिवे, पोकॉ/८१५ उमेश खेडकर, पोहेकॉ/४९२ सुनिल पवार, पोहेकॉ अजय साठे, पोकॉ/अमोल कांबळे, पोकॉ/अक्षय भोसले, पोकॉ/सुनिल दिघे तसेच शेवगांव पोलीस स्टेशनचे सपोनि सुंदरडे, मपोहेकॉ/गितांजली पाथरकर, मपोका/कल्पना गावडे, मपोकॉ/प्रियंका निजवे, मपोकॉ/सविता शिंदे, पोकॉ/अंगरखे, पोकॉ/राहुल गुंजाळ, पोकॉ/नकुल फालके यांचे पथकाने केली आहे.

वेश्या
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वेश्या
वेश्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वेश्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *