वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी कॅम्प उपक्रम कौतुकास्पद – गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज
नेवासा – नेवासाफाटा येथील आत्मदीप मेडिकल फाऊंडेशन व श्वास फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर-अहिल्यानगर हायवेवर असलेल्या देवगडफाटा येथील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी कॅम्पचा शुभारंभ बुधवारी दि.१८ जून रोजी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.विदर्भ मराठवाडा,खानदेश येथून पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी कॅम्प हा आत्मदीप फाऊंडेशन व श्वास फार्माचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना काढले.

श्री गुरूदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत राष्ट्र संत श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संकल्पनेनुसार वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी कॅम्पसाठी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी हवी ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून हदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे व आत्मदीप फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब कोकणे व सर्व सदस्य डॉक्टर मंडळी मोफत आरोग्य तपासणी कॅम्पसाठी योगदान देणार आहे.मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबांच्या हस्ते वारकऱ्यांना औषधे देऊन करण्यात आला. वारकऱ्यांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी कॅम्पचा शुभारंभ गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संभाजीनगर रस्त्यावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आत्मदीप फाउंडेशनच्या डॉक्टर मंडळींच्या वतीने करण्यात आली.

यावेळी झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार कॅम्पच्या उदघाटन प्रसंगी हभप नारायण महाराज ससे,संतसेवक बाळू महाराज कानडे,पंचायत समितीचे माजी सदस्य कैलास झगरे,मुरमे गावचे सरपंच अजय साबळे,डॉ.सुनील राऊत, मोफत आरोग्य तपासणी कॅम्पचे प्रमुख डॉ. अविनाश काळे,डॉ.किरण ढगे,डॉ.पार्थ मरकड,डॉ.नरेंद्र भदगले,डॉ.प्रियंका कव्हळे,व्यवस्थापक प्रकाश शेटे यांच्यासह अटलबिहारी वाजपेयी होमिओपॅथी कॉलेजचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ.अविनाश काळे म्हणाले की गुरुवर्य श्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोफत आरोग्य तपासणी कॅम्प सुरू केला असून पहिल्या टप्प्यात पंढरीच्या वाटेवर देवगडफाटा येथे सात दिवस,दुसऱ्या टप्प्यात कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे तर तिसऱ्या टप्प्यात दि.१ ते ६ जुलै या कालावधीत पंढरपूर येथील देवगडच्या मठामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रम सुरू राहणार असल्याचे सांगितले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.