पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील श्री हनुमान विद्यालयाचा मा विद्यार्थी शिवम कैलास गोर्डे याची राज्यस्तरीय कबड्डी संघात नुकतीच निवड झाली आहे.
टाकळीभान येथील ओन्ली साई क्लब कडून शिक्षण घेवून प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली होती. पण त्याचे खेळण्याचे कौशल्य बघून त्याची राज्यस्तरीय कबड्डी संघात निवड झाली आहे.

शिवम हा एक शेतकरी कुटुंबातील सदस्य असून शिक्षणाचा बरोबर खेळाची आवड असल्याने त्यानी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत खेळून आता राज्यस्तरीय कबड्डी संघा कडून खेळणार असल्याने श्री हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद,ग्रामपंचायत प्रशासन व बेलपिंपळगाव गावातील सर्व ग्रामस्थांनी शिवम गौर्डे याचे अभिनंदन केले आहे.शेतकरी कुटुंबातील हा विद्यार्थी राज्यस्तरीय कबड्डी संघात सामील झाल्याचे आनंद त्याच्या कुटुंबानी व्यक्त केला त्याच बरोबर त्याला शिक्षक व सर्व गोर्डे कुटुंबियांचे मार्गदर्शन लाभले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.