ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पंढरपूर

दिंडीत १७ भाविक सायकलस्वार वर रवाना,आजच्या भव्य दिव्य सायकल रिंगण सोळ्यात सहभाग.

पाचेगाव फाटा – वारी पंढरीची या ओवी प्रमाणे गुड मॉर्निंग ग्रुप आयोजित पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शन वारीसाठी सायकल वरून पाचेगाव येथील ग्रामदैवत श्री गहिनीनाथ महाराजांना नारळ अर्पण करून भक्तीभावाने दर्शन घेऊन शुक्रवार दिनांक २०जून पहाटे चारच्या सुमारास प्रस्थान करून सायकलस्वार भाविक निघाले. या सायकल वारीचा मार्गक्रम पाचेगाव,वाटापुर,तामसवाडी मार्ग वडाळा, घोडेगाव, अहिल्यानगर या ठिकाणी दुपारी जेवणासाठी थांबले होते व त्यानंतर सुखरूप प्रवास करत संध्याकाळचा मुक्काम हा करमाळा ठिकाणावर करण्यात येऊन व काल दुसऱ्या दिवशी करमाळा या ठिकाणाहुन सायकल रॅली निघून संध्याकाळी पंढरपुरात मुक्कामासाठी दाखल झाले आहे. आज रविवार रोजी पंढरपूर रेल्वे स्टेशन शेजारी भव्य दिव्य असा सायकल रिंगण सोहळा पार पडणार आहे.

पंढरपूर

त्यानंतर महाप्रसाद घेऊन रॅलीची सांगता होईल या रॅलीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास साडेचार हजार सायकल लिस्ट हे पंढरपुरात काल २१जून रोजी दाखल झाले आहे.आज २२ जूनला हा भव्य दिव्य असा सायकल रिंगण सोहळा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भूमीत संपन्न होणार आहे. त्यानंतर अखिल भारतीय सायकल महाराष्ट्र संघ यांच्याकडून काही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असून हे पुरस्कार गुड मॉर्निंग ग्रुप सायकल क्लब यांना मिळण्याची अपेक्षा गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.तसेच सुपर सायकल स्टार या नावाने विजेत्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पंढरपूर


तसेच तीस दिवसात जवळपास एक हजार किलोमीटर अंतर पार करणाऱ्या व्यक्तीला देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सायकल राईटचं नियोजन पाचेगाव येथील वैद्यकीय क्षेत्रातील तसेच गुड मॉर्निगचे अध्यक्ष डॉ वाल्मीक तुवर,डॉ संकेत मुंदडा,सेक्रेटरी गणेश पवार व ग्रुपचे मार्गदर्शक भास्कर शिंदे,देवेंद्र दुप्पड यांनी मोलाचे सहकार्य करून ही सायकल दिंडीचे आयोजन केलेले आहे.
या सायकल वारीत गुड मॉर्निग डॉ वाल्मीक तुवर,भास्कर शिंदे,गणेश पवार,ज्ञानेश्वर क्षिरसागर,गणेश माकोणे,दत्तात्रय सुपेकर,संदीप पवार,योगेश तुवर,नामदेव तुवर,गणेश तुवर,
भानुदास मगर,अभिषेक शिंदे,तुषार जाधव,अक्षय जाधव,संतोष तुवर,अर्जुन शिंगोटे, अभिषेक तुवर असे सतरा भाविकांनी सहभाग नोंदवला आहे.

पंढरपूर


गुड मॉर्निग ग्रुपचे सर्व सदस्य पहिल्या दिवशी १६० किलोमीटर अंतर सुखरूप पार करून पहिला मुक्काम करमाळा येथे केला आहे.काल उर्वरित ८७ किलोमीटर अंतर पार करून पंढरपूर येथे सुखरूप दाखल झाले आहे.दोन दिवसात तब्बल २४७किलोमीटरचा अंतर हे सायकल चालून पार केले असून सर्व गुड मॉर्निगचे सदस्य ठीक आहे.पाचेगाव येथून अनेक भाविक चारचाकी गाड्यात, एस टी व वेगवेगळ्या पायी दिंडीत सहभागी होऊन पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात.पण प्रथमच सायकल आव्हानात्मक वारी पाचेगावातून गेल्याने गावातील नागरिकांनी या सर्व गुड मॉर्निग सदस्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

पंढरपूर
पंढरपूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पंढरपूर
पंढरपूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पंढरपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *