नेवासा – महिला ग्रामसभा बंद पाडणाऱ्या आरोपीस दोन खटल्यात,दोषी धरून राहाता येथील मा. सत्र न्यायाधिश आर.एस.गुप्ता साहेब यांनी शिक्षा सुनावली. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मौजे हणमंतगाव ता.राहाता ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महिला सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी यांचे अधिपत्याखाली, दि.२९/०९/२०१७ रोजी महिला ग्रामसभा चालु असताना, आरोपी भास्कर बाबुराव फणसे हे अनाधिकारे सभेत घुसले व त्यांनी उपस्थित महिला सदस्यांपैकी दोन सदस्यांना शिविगाळ करून , जीवे मारण्याची धमकी दिली व सभा बंद पाडली.

त्यामुळे सदर आरोपी विरूद्ध ग्रामविकास अधिकारी व महिला सदस्य यांनी वेगवेगळ्या दोन फिर्याद लोणी पोलीस स्टेशनला दिल्या.ग्रामसेवक सूर्यभान गायकवाड यांनी दिलेल्या फिर्याद वरून आरोपी विरूद्ध गु.र.नं.१४३/२०१९ भा.द.वि. क ३५३,१८६,५०४ प्रमाणे व महिला सदस्य सौ.अनाप यांनी दिलेल्या फिर्याद वरून गु.र.नं.१४४/२१९ भा.द.वि.क.४४८,५०४,५०६ प्रमाणे गुन्हे लोणी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले होते. सदर घटनेचा तपास होवुन दोन दोषारोपपत्र मा.न्यायालयात दाखल करण्यात आले.

सदर दोन खटल्यात सरकार पक्षातर्फे एकुण ५-५ साक्षीदार तपासण्यात आले.सरकार पक्षाचा पुरावा व सरकारी वकील एम.आर.नवले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून,आरोपीस एका खटल्यात भा.द.वि.क१८६ अन्वये दोषी धरून २०००/- रूपये द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात आली व दुसरे खटल्यात भा.द.वि.क ५०६ अन्वये दोषी धरून ५००/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावणण्यात आली.सदरच्या खटल्यात सरकारी अभियोक्ता एम.आर.नवले व गुजर यांनी कामकाज पाहिले .त्यांना पो.कॉं.माळी,पो.कॉं.सुभाष माळी ,पो.कॉं.कुदळ, पो.कॉं.बुगे यांचे सहकार्य मिळाले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.