ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पंप

नेवासा – शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कॉल करून मी संदीप बोडके बोलत असून तुम्ही सौर पंप मिळणे करिता अर्ज केला आहे. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुम्ही माझ्या फोन-पेवर अनामत रक्कम पाठवा. तुमचे पैसे आज पोहोच झाल्यावर उद्याच तुमचा सौर पंप बसवण्याचे काम करतो, अशी बतावणी करून अहिल्यानगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना फसवणाऱ्यास पोलिसांनी सिताफिने अटक केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाश पांडुरंग ढोकणे रा. गोपाळपूर ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांना दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी संदीप बोडके नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर कॉल केला व तुम्ही सौर पंप मिळणे करिता अर्ज केला आहे. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे.

पंप

तुम्ही माझ्या फोन-पेवर अनामत रक्कम पाठवा. तुमचे पैसे आज पोहोच झाल्यावर उद्याच तुमचा सौर पंप बसवण्याचे काम करतो. सुरुवातीस फिर्यादी प्रकाश ढोकणे यांनी प्रतिसाद दिला नाही. परंतु नंतर अनेकदा फोन करून इन्शुरन्सचे 3400/- रुपये फोन पे करा असे म्हणाला. त्यावर फिर्यादी प्रकाश ढोकणे यांनी संदीप बोडके यास फोन-पेवर सौर पंपाच्या इन्शुरन्सचे 3400 पाठवले. परंतु नंतर संदीप बोडके याने फोन घेण्याचे बंद केले. त्या नंतर फिर्यादी प्रकाश ढोकणे यांना संशय आला व त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तसेच अधिक माहिती घेतली असता त्यांच्या ओळखीचे संदीप गव्हाणे रा. मसले, बाबा घुले रा. तरवडी व शरद गायकवाड रा. वाकडी यांची देखील फसवणूक झाल्याचे समजले. या फसवणुकी बाबत प्रकाश ढोकणे यांनी पोलीस ठाणे नेवासा येथे तक्रार दिल्याने संदीप दिलीप बोडके रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

पंप

दरम्यान अशाच प्रकारची फसवणूक राहुरी तालुक्यातही झाली असल्याने पोलीस ठाणे राहुरी येथे देखील संदीप बोडके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. संदीप बोडके यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर व राहुरी पोलिसांनी सिताफिने जायबंद केले आहे.
संदीप बोडकेवर यापूर्वी दरोड्याची तयारी सारखे गंभीर गुन्हे पोलीस ठाणे नेवासा येथे नोंद आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या अशा प्रकारची फसवणूक झाली असेल त्यांनी त्यांच्या स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन धनंजय अ. जाधव पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नेवासा यांनी केले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासाकडील पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत.

पंप
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पंप
पंप
पंप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पंप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *