ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मत्स्य

नेवासा –तालुक्यात जायकवाडीच्या फुगवटा पाण्यावर जायकवाडी धरणग्रस्त मच्छीमारी करणाऱ्यांचा व्यवसाय सुरुवातीच्या काळात दोन दशके चांगला होता तथापि मागील एका दशकापासून या व्यवसायात येणाऱ्या अनेक  अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे मच्छी व्यवसायामध्ये दुर्दैवाने खंड पडत चालला आहे. जायकवाडी धरणातील मत्स्य संदर्भातील जैविक विविधता व शास्त्रीय अभ्यास याविषयावरील अहवाल डॉक्टर अशोकराव ढगे यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्याकडे सादर केला आहे.

मत्स्य

ज्या मत्स्य प्रजातींना बाजारात मागणी नाही त्याचे प्रमाण जायकवाडी  धरणातील पाण्यामध्ये वाढत आहे तर ज्या मत्स्य प्रजातींना बाजारात चांगला भाव मिळतो व ग्राहक पसंती मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे जायकवाडी धरणातील पाण्यामध्ये प्रमाण कमी होत चालले आहे त्यासाठी योग्य प्रजातीचे मत्स्यबीजे जायकवाडी धरणातील पाण्यात सोडणे उपयुक्त ठरेल अशा प्रकारची बहुमोल सूचना अहवालात देण्यात आली आहे.

मत्स्य

चिलापी मत्स्य प्रजात इतर प्रजातींच्या छोट्या माशांना खाऊन टाकते आणि चिलापी जातीला योग्य दर मिळत नाही कारण ग्राहकांची पसंती नाही,मत्स्य उद्योग मंत्री नामदार नितेश राणे यांनी मत्स्यालय विभाग कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे राहू सारख्या मत्स्यबीजांची जायकवाडी पाण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने नेवासा तालुक्याचे  आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पावसाळी अधिवेशन यांनी भेट घेऊन या प्रश्नावर लक्षवेधी करावी
     मत्स्य व्यवसायावर सोलर ऊर्जा प्रकल्पाचे संकट अजूनही टांगती तलवार सारखे आहे यासाठी मच्छीमार व्यवसाय करणाऱ्यांनी आंदोलने करून जायकवाडी धरण पाणीपुरवठा परिसरात सोलर प्रकल्पाला विरोध केला आहे त्याचाही गांभीर्याने विचार करावा अशी मागणी डॉ. अशोकराव ढगे यांनी दिलेल्या अहवालात केली आहे

मत्स्य
मत्स्य

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मत्स्य
मत्स्य

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मत्स्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *